ज्वारीची उकड कशी करायची
ज्वारीची उकड हा जुना पारंपरिक आरोग्याला पोषक असा नाश्ता आहे. पटकन होणारा आणि अगदी थोड्या सामनात करता येणारा असा हा पदार्थ आहे.
ज्वारीची उकड करण्यासाठी आवश्यक साहित्य
- १/४ वाटी ज्वारीचे पीठ
- ४-५ लसणीच्या पाकळ्या
- मीठ १/२ चमचा किंवा चवी प्रमाणे
- साखर चिमुटभर
- पाणी - १ १/२ कप किंवा जरूरीपरमाणे
- तेल - 1 चमचा
- मोहोरी - 1/4 चमचा
- जीरे - 1/4 चमचा
- हिंग - 1 चिमूटभर
- कढीलिंबाची पाने - 4-5
- एका बाउलमधे ज्वारीचे पीठ व दही किवा ताक घेऊन नीट मिसळणे. गुठळया होणार नाहीत याची काळजी घ्या. या मिश्रणात मीठ व साखर घाला.
- कढईत तेल तापवा. त्यात मोहोरी व जीरे घालून ते तडतडले की त्यात हिंग व कढीलिंबाची पाने घाला.
- फोडणीत ठेचलेला लसूण घाला. यात ज्वारीचे मिसळलेले पीठ घालून हात फिरवत रहा. पीठ पटकन शिजू लागते तेव्हा ढवळत राहणे आवश्यक आहे. जरूर वाटल्यास थोडे पाणी घाला. आवडी प्रमाणे घट्ट किवा पातळ करा.
- झाकण ठेऊन एक वाफ येउ द्या.
- ज्वारीची उकड खायला तयार आहे.