Monday, May 06, 2019

ज्वारीची उकड कशी करायची - पटकन होणारा शाकाहारी नाश्ता - Sorghum flour recipe


ज्वारीची उकड कशी करायची

आवश्यक साहित्य

  • १/४ वाटी ज्वारीचे पीठ 
  • ४-५ लसणीच्या पाकळ्या 
  • मीठ १/२ चमचा किंवा चवी प्रमाणे 
  • साखर चिमुटभर 
  • पाणी - १  १/२ कप किंवा जरूरीपरमाणे 
फोडणीसाठी साहित्य:
  • तेल - 1 चमचा 
  • मोहोरी - 1/4 चमचा
  • जीरे - 1/4 चमचा
  • हिंग - 1 चिमूटभर
  • कढीलिंबाची पाने - 4-5

ज्वारीची उकड करायची कृती :

  1. एका  बाउलमधे ज्वारीचे पीठ व दही किवा ताक घेऊन नीट मिसळणे.  गुठळया  होणार नाहीत याची काळजी घ्या. या मिश्रणात मीठ व साखर घाला.
  2. कढईत तेल तापवा. त्यात मोहोरी व जीरे घालून ते तडतडले की त्यात हिंग व कढीलिंबाची पाने घाला. 
  3. फोडणीत ठेचलेला लसुन घाला.  यात ज्वारीचे मिसळलेले पीठ घालून हात फिरवत रहा. पीठ पटकन शिजू लागते तेव्हा ढवळत राहणे आवश्यक आहे. जरूर वाटल्यास थोडे पाणी घाला. आवडी प्रमाणे घट्ट किवा पातळ करा. 
  4. झाकण ठेऊन एक वाफ येउद्या. 
  5. ज्वारीची उकड खायला तयार आहे.